Banner-1

शिवशंभू ट्रस्ट बद्दल माहिती -

सर्वाना जय भीम, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती,

शिव -शाहू -फुले -आंबेडकरांच्या विचारांवरती व छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले (महाराज) व छत्रपती शाहू महाराजांचे वंशज युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट कमिटी महाराष्ट्र राज्य (रजि: ९५६/२०१८/पुणे/ महाराष्ट्र) (एफ नं – ५२९५५)
12A / 80G / CSR Income Tax मान्यताप्राप्त संस्था झाली रक्तदान तसेच वैद्यकीय क्षेत्रात काम करत असून मागील महिन्यात ५ वर्ष संस्थेला पूर्ण झाली.

महाराष्ट्रामध्ये रक्तदान क्षेत्रात युवकांना घेऊन रक्तदानाची चळवळ उभी करण्याच्या हेतून व गरजू रुग्णांना मोफत रक्ताची बॅग उपलब्ध करून देण्याच्या हेतून 14 जून 2018 साली पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी या छोट्या गावातील शिवश्री भूषण सुर्वे यांनी तालुक्यातील युवकांच्या साथीने शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली, आज बघता बघता रक्तदानाच्या चळवळीला ६ वर्ष पूर्ण झाले.

संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट कमिटीच्या माध्यमातून ब्लड बँकेसोबत सामंजस्याने टायप करुन ट्रस्टच्या नावाने १५% ते २०% चा कोठा उपलब्धते नुसार मान्यता घेतली गेली त्यानंतर चळवळीला सुरुवात झाली यावेळी ४०,००० च्या पुढे रक्तदाते, ८५०+ च्या पुढे रक्तदान शिबिरे व ११०० च्या पुढे मोफत बॅग महाराष्ट्रामध्ये उपलब्ध करुन देण्याचे काम या ट्रस्टच्या माध्यमातून केले जात आहे त्यामधे पुणे, सोलापूर, उमरगा, इंदापूर, बारामती, सातारा, धाराशिव, तुळजापूर, कोल्हापूर या सर्व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या एकजुटीने पार पाडता आले असे यावेळी ट्रस्टचे संस्थापक शिवश्रीभूषण सुर्वे यांनी सांगितले.

उद्देश - रक्तदान शिबिराचे आयोजन किंवा रक्तदान का करावे..!!

1 – श्री शिवशंभू ट्रस्ट च्या माध्यमातून रक्तदान केल्यानंतर आपणांस रक्ताची गरज लागल्यास अवघ्या जुळवणी चार्जेस भरून रक्ताची मोफत बॅग दिली जाते, हे आजपर्यंत महाराष्ट्रातील 800 च्या वरती लोकांनी अनुभवले आहे.
2 – श्री शिवशंभू ट्रस्ट च्या माध्यमातून रक्तदान केल्यानंतर रक्तदात्याचा विचार करून 3 लाख रु किमतीचा (न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचा) अपघाती विमा काढून दिला जातो.काही लोकांचा अगोदरचा विमा असेल तर रक्तदात्याचा विचार करून त्याच्या साजेशी असे आकर्षक गिफ्ट ट्रस्टच्या फंडातून उपलब्ध करून दिले जाते (उदा. टी-शर्ट, ट्रॉफी) यापैकी कोणतेही एक.
3 – श्री शिवशंभू ट्रस्ट च्या माध्यमातून महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात व शहरात रक्त मिळण्याची तरतूद ट्रस्ट कमिटीमार्फत केली आहे.
पुढीलप्रमाणे: पुणे जिल्हा, सोलापूर, सातारा, बारामती, करमाळा, भिगवण, पंढरपूर, माळशिरस, पिंपरी-चिंचवड, लोणावळा, लोणंद, उमरगा, बार्शी, बीड, उस्मानाबाद, यवतमाळ, गोंदिया, कोल्हापूर, सांगोला, फलटण, नवी मुंबई, उल्हासनगर, सांगली, लातूर, कुर्डुवाडी, दौंड इत्यादी शहरात.

web banner 2024 03


4 – आपण जर श्री शिवशंभू ट्रस्टच्या माध्यमातून रक्तदान केले असेल तर आपणांस शिवशंभू ट्रस्टचे सर्टिफिकिट दिले जाते त्यानंतरच ज्या ब्लड बँकेसोबत करार असेल तिथून जुळवणी चार्जेस (२०० किंवा ३०० रुपये घेऊन) मोफत बॅग दिली जाते.
5 – श्री शिवशंभू ट्रस्ट च्या माध्यमातून रक्तदान केल्यास एका पेशंटच्या नावाने फक्त 1 बॅग मोफत दिली जाते. (याचे कारण: मोफत रक्त मिळते आहे म्हणून दुसऱ्यांचे सर्टिफिकिट गोळा करून घेऊन येतात).
6 – श्री शिवशंभू ट्रस्ट च्या माध्यमातून महाराष्ट्रातील ट्रस्टच्या नियमाप्रमाने ठराविक ब्लड बँकेसोबत मोफत रक्ताच्या बॅगेसाठी करार केलेले असतात, म्हणून आपण रक्तदान केल्यास आपणास 100% बॅग मोफत मिळवून देण्यासाठी आम्ही पूर्ण पणे कटिबद्ध राहणार आहोत.