सर्वाना
जय भीम, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती..
शिव -शाहू -फुले -आंबेडकरांच्या विचारांवरती व छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले (महाराज) व छत्रपती शाहू महाराजांचे वंशज युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट कमिटी महाराष्ट्र राज्य (रजि: ९५६/२०१८/पुणे/ महाराष्ट्र) (एफ नं – ५२९५५) 12A / 80G / CSR Income Tax मान्यताप्राप्त संस्था झाली रक्तदान तसेच वैद्यकीय क्षेत्रात काम करत असून मागील महिन्यात ५ वर्ष संस्थेला पूर्ण झाली.
महाराष्ट्रामध्ये रक्तदान क्षेत्रात युवकांना घेऊन रक्तदानाची चळवळ उभी करण्याच्या हेतून व गरजू रुग्णांना मोफत रक्ताची बॅग उपलब्ध करून देण्याच्या हेतून 14 जून 2018 साली पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी या छोट्या गावातील शिवश्री भूषण सुर्वे यांनी तालुक्यातील युवकांच्या साथीने शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली, आज बघता बघता रक्तदानाच्या चळवळीला ६ वर्ष पूर्ण झाले. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट कमिटीच्या माध्यमातून ब्लड बँकेसोबत सामंजस्याने टायप करुन ट्रस्टच्या नावाने १५% ते २०% चा कोठा उपलब्धते नुसार मान्यता घेतली गेली त्यानंतर चळवळीला सुरुवात झाली यावेळी ४०,००० च्या पुढे रक्तदाते, ८५०+ च्या पुढे रक्तदान शिबिरे व ११०० च्या पुढे मोफत बॅग महाराष्ट्रामध्ये उपलब्ध करुन देण्याचे काम या ट्रस्टच्या माध्यमातून केले जात आहे त्यामधे पुणे, सोलापूर, उमरगा, इंदापूर, बारामती, सातारा, धाराशिव, तुळजापूर, कोल्हापूर या सर्व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या एकजुटीने पार पाडता आले असे यावेळी ट्रस्टचे संस्थापक शिवश्रीभूषण सुर्वे यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1930 पुण्यात शिवनेरी किल्ल्यावर झाला.छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा सम्राज्याचे संस्थापक व आदर्श राजा होते. शिवरायांनी वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली.त्यांनी ‘गामिनी कावा ‘ तंत्राचा वापर करून अनेक गड किल्ले जिंकले.त्यांनी शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करून अनेक बलाढ्य शत्रुंचा पराभव केला. 06 जून 1674 रोजी शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक झ्हाला. त्यांनी आपल्या स्वराज्यात सर्वांना सामान न्याय व सामानतेची वागणूक दिली. दुर्दैवाने, 3 एप्रिल 1680 रोजी छत्रपती शिवाजी महाराज्यांनी अखेरचा श्वास घेतला.
छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आजही आपल्या सर्वांना प्रेरणा देते. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हते तर ते साऱ्या राष्ट्राचे होते.त्यांनी थोर तत्ववेत्यांच्या शिकवणुकीतून स्फृती घेतली होती. छत्रपती शिवाजी महाराज एक थोर सेनानी होते.स्वतंत्ररक्षणासाठी आरमाराची आवश्यकता व महत्व त्यांना पटले होते.इंग्रज व डच यांच्या आक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी त्यांनी प्रबळ आरमार उभारले . छत्रपती शिवाजी महाराजांचे आपल्या देशावर फार प्रेम होते आणि मानवी सद्गुणांचे तर ते साक्षात प्रतिक होते
मराठा साम्राज्याचे दुसरे शासक आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र छत्रपती संभाजी भोंसले यांचा जन्म १४ मे १६५७ रोजी पुण्याजवळील पुरंदर किल्ल्यावर झाला. छत्रपती संभाजी महाराज हे औरंगजेबाचे सर्वात शक्तिशाली प्रतिस्पर्धी होते. त्याने मुघल साम्राज्यातील दोन महत्त्वाचे किल्ले, विजापूर आणि गोलकोंडा आपल्या स्नायूंच्या बळावर हल्ला करून काबीज केले होते. छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या शौर्याने आपले नाव भारताच्या इतिहासाच्या पानावर सुवर्ण अक्षरांनी कोरले होते. कारण मुघल सम्राट औरंगजेबाच्या लाखो क्रूरता आणि प्रयत्नांनंतरही संभाजींनी धर्म बदलला नाही. त्यामुळे वयाच्या अवघ्या ३१ व्या वर्षी क्रूर औरंगजेबाने संभाजी महाराजांची हत्या केली. लहानपणापासून ते मुघल साम्राज्याच्या विरोधात असायचे. त्यामुळं महाराजांचं साम्राज्य मुघल, सिंधी, म्हैसूर आणि पोर्तुगालमध्ये पसरलं होतं.
छत्रपती संभाजी महाराजांच्या शिक्षणाविषयी सांगायचे तर महाराजांना संस्कृतसह १३ भाषांचे ज्ञान होते. घोडेस्वारी, धनुर्विद्या आणि तलवारबाजी यात ते लहानपणापासूनच निपुण होते.
शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवन देश आणि हिंदुत्वासाठी समर्पित आहे.